Hindi Typing Speed Test...
Monday, 20 November, 2017, Time : 11:12 PM


ऑनलाइन लोकमत पाटणा, दि. १५ उद्धव ठाकरे यांना मी युती तोडू नका असा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी तो ऐकला नाही असे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी शनिवारी केले आहे. पाटणा येथे पत्रकारांशी बोलताना आडवाणी म्हणाले की भाजपा शिवसेनेच्या निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू होत्या. त्यावेळी मी स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि युती तोडू नका असा सल्ला दिला असे आडवाणी म्हणाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एका दिवसा अगोदरपर्यंत युतीची चर्चा सुरू होती. भाजपाने गेल्या वर्षीच्या तुलनेत शिवसेनेन मित्रपक्षांसाठी जास्त जागा सोडाव्यात अशी मागणी केली होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यास साफ नकार दिला होता. चर्चेचे गु-हाळ शेवटपर्यंत चालल्यानंतर अखेर भाजपाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि गेले २५ वर्षे असलेली युती तुटली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून आधी नितिश कुमार यांचा जनता दल (सेक्यलुर) हा पक्ष रालोआमधून बाहेर पडला तर वर्षभरातच जागा वाटप फिस्कटल्यामुळे शिवसेनेने महाराष्ट्रातली युती तोडली. याप्रकरणामध्ये दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांना जबाबदार धरत असले तरी आडवाणी यांनी मात्र उद्धव ठाकरे यांनी आपला सल्ला ऐकता युती तोडल्याचे म्हटले आहे. आयपीएल फिक्सिंग: सुप्रीम कोर्टाकडून नावे उघड नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग च्या सहाव्या पर्वात आवृत्तीच्या सामन्यांमध्ये झालेल्या कथित स्पॉट फिक्सिंग बेटिंग घोटाळ्य़ाची चौकशी केलेल्या न्या. मुदगल समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष एन. श्रीनिवासन त्यांचे जावई गुरुनाथ मयप्पन यांच्यासह चार क्रिकेट प्रशासकांची चौकशी केली असून त्यांच्याविरुद्ध प्रतिकूल शेरे मारले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उघड केले. बिहार क्रिकेट असोसिएशनने केलेल्या याचिकेच्या निमित्ताने न्यायालयाने या ‘आयपीएल स्पॉट फिक्सिंग’चा विषय हाती घेतला आहे. या घोटाळ्य़ाची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तीन सदस्यांची समिती नेमून स्वत:हून केलेली चौकशी अमान्य करून न्यायालयाने निवृत्त न्यायाधीश मुकुल मुदगल यांची चौकशी समिती नेमली होती. समितीने अंतिम चौकशी अहवाल अलीकडेच सीलबंद लखोटय़ात न्यायालयात सादर केला होता. शुक्रवारी हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी आले तेव्हा न्या. टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मुदगल समितीच्या अहवालातील काही उतारे वाचून समितीने ज्यांची चौकशी केली आहे त्यांची नावे उघड केली. सुरुवातीस न्यायालयाने अनवधनाने प्रशासकांसह तीन खेळाडूंचाही नामोल्लेख केला. मात्र नंतर न्यायाधीशांनी खेळाडूंची नावे प्रसिद्धी माध्यमांनी उघड करू नयेत, असे सांगितले. या घोटाळ्य़ात काही व्यक्तींनी गैरवर्तन केल्याचे मुदगल समितीस आढळले आहे, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने उघड केलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे पदावर नसलेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन, आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन, श्रीनिवासन यांचे जावई आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचे मुख्य अधिकारी गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहमालक राज कुंद्रा यांची मुदगल समितीने चौकशी केली आहे. या चौघांविरुद्ध समितीने प्रतिकूल शेरे मारले असल्याचेही स्पष्ट झाले. कारण न्यायालयाने या चौघांनाही या प्रकरणात प्रतिवादी करून घेतले आणि समितीच्या अहवालाचा संबंधित भाग त्यांना देण्यात यावा या चौघांनी त्यावर आपले म्हणणो चार दिवसांत मांडावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. मुदगल समितीच्या 35 पानी अहवालातील खेळाडू वगळून इतरांच्या संदर्भातील भाग उघड करायला हरकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क च्भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नोव्हेंबर रोजी होणा:या वार्षिक सर्वसाधारण सभेत नव्या पदाधिका:यांची निवड करण्याचा कार्यक्रम ठरविला होता. च्परंतु मुदगल समितीच्या अहवालावरून समोर आलेल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावल्याखेरीज आम्ही निवडणुकीविषयी काहीच सांगू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने तारखेची निवडणूक चार आठवडय़ांसाठी पुढे ढकलण्यात येत असल्याचे बीसीसीआयच्या वकिलाने सांगितले. मुळात सप्टेंबरमध्ये ही निवडणूक व्हायची होती. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सलग तिसऱयांदा सत्ता भोगत असल्याने त्यांना सत्तेचा माज आला आहे. उसाला साडेतीन हजारांचा दर मिळावा, यासाठी टाहो फोडणाऱया शेतकऱयांची दया सत्ताधाऱयांना येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी त्यांच्या घरावर मोर्चा काढावा लागला. लोकशाही मार्गाने साडेतीन हजार रूपयांचा भाव मिळत नसेल तर साखर सम्राटांना धडा शिकवण्यासाठी कारखाने फोडण्याची तयारी असल्याचा इशारा देत मागणी मान्य झाल्यास पुणे येथे साखर आयुक्त विजय सिंघल यांना घेरण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला. कराड येथे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय मोहिते, हणमंत चौरे, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनास आनंदराव पवार, संदीप सुतार, संदीप पाटील, कराड तालुकाप्रमुख समीर जधव, शहरप्रमुख हणमंत घाडगे, मलकापूर शहरप्रमुख तानाजी देशमुख, माजी तालुकाप्रमुख नितीन काशिद यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांचा चकवा अन् पोलिसांची तारांबळ दत्त चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर शेकडो शिवसैनिकांचा जमाव घोषणाबाजी करत होता. येथून जमाव तहसील कार्यालयासमोरून शाहू चौक मार्गे पुन्हा दत्त चौकात येणार होता. मात्र अचानक घोषणाबाजी करणारे शिवसैनिक मागे फिरत पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे चाल करू लागले, तेव्हा पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस अधिकाऱयांसह कर्मचारीही शिवसैनिकांच्या मागे पळत सुटले. पोलिसांनी शिवसैनिकांना दत्त चौकातच रोखले. रस्त्यावर ठिय्या दिल्याने वाहतूक कोंडी दत्त चौकात मोर्चा रोखल्यानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने तेथेच सभा सुरू झाली. सुमारे तासभर सभा सुरू होती. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. एका बाजूची वाहतूक शाहू चौकातच थांबवण्यात आल्याने वाहनधारकही ताटकळले होते. शिवसैनिकांसह पदाधिकाऱयांची वाहनेही याच परिसरात पार्क झाल्याने प्रचंड कोंडी झाली होती. कारखानदार गब्बर झालेत आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, तीन वर्षात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱयांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही. ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत असताना कारखानदार मात्र त्यांच्या जीवावर कोटय़वधींची माया जमवून गब्बर झाले आहेत. त्यामुळे उसाला साडेतीन हजारांचा दर आम्ही मागत आहोत. तुम्ही जर मागून देत नसाल तर हिसकावून घेण्याची ताकद आणि धमक आमच्यात आहे. आमदार मिणचेकर म्हणाले, ऊसदराचा प्रश्न घेऊन आंदोलन छेडले आहे. शेतकऱयांचा विजय झाल्याशिवाय याचा शेवट होणार नाही. शेतकऱयांच्या हितासाठी आपण शिवसेनेच्या छत्राखाली अंतिम श्वासापार्यंत लढाई करू कराडात आला तर पाय तोडू शेतकरी संघटनेच्या शंकर गोडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत संजय मोहिते म्हणाले, शेतकऱयांचे भले होण्याची आम्ही धडपडत असताना शंकर गोडसेंसारखे नतद्रष्ट आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. एक काळ शिवसेनेच्या जीवावर मोठे होणाऱया गोडसे यांनी यापुढे तोंड सांभाळून बोलावे. शिवसैनिकांच्या आडवे याल तर पाय तोडू. भाऊंच्या पाठिंब्याने शिवसैनिक चार्ज सदाभाऊ खोत शिवसेनेच्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. खोत म्हणाले, शेतकऱयांच्या हितासाठी आगामी निवडणुकीत आघाडी सरकारला हद्दपार करायला हवे. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी सेना, भाजपसह सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

Type the underline word and hit SPACE
Time : 180s WPM : 0 Accuracy : 0 %
Type with Custom Text
TypingTester.Org helps you in calculating your typing speed test words per minute (WPM), characters per minute (CPM) and total characters typed (?)% correctly (ACCURACY). This words are taken from the basic 1500 words from Hindi Language.
Type in English and Press Space to Convert in Hindi
Copy Text Notepad MS Word Post ⇒ Twitter Post ⇒ Gmail Post ⇒ Blogger
Bubbles Typing Speed Games
Bubbles Typing Games
Keybricks Typing Speed Games
Keybricks Typing Games
Keyphant Typing Speed Games
Keyphant Typing Games
Keytris Typing Speed Games
Keytris Typing Games
Numpad Typing Speed Games
Numpad Typing Games
Snakeabc Typing Speed Games
Snakeabc Typing Games
Starkeys Typing Speed Games
Starkeys Typing Games
Tiptapkeys Typing Speed Games
Tiptapkeys Typing Games
Language Keyboards With Source Code :